ग्रुप ग्रामपंचायत दहिसर तर्फे तारापूर

२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ६५०  कुटुंबे राहतात. एकूण २९७६ लोकसंख्येपैकी १५०६ पुरुष तर १४७० महिला आहेत. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात.श्रावण महिन्यात गणपती उत्सवाच्या अगोदरपासून जेव्हा ढग गडगडाट करतात आणि विजा चमकत असतात तेव्हा पावसाच्या सरी कोसळत असलेल्या एका वेगळ्याच नैसर्गिक वातावरणात एक नैसर्गिक भाजी रानात उगवत असते तिलाच अळंबी संबोधले जाते. ही भाजी अत्यंत चवदार असते. ही भाजी आरोग्यासाठी चांगली असते.ही भाजी जेव्हा उगवते तेव्हाच लगेच काढावी लागते अन्यथा ती लगेच फुलून खाण्यासाठी अयोग्य होते. पहाटे लवकर उठून ही भाजी शोधून फुलण्याअगोदर खुडून काढून साफ करून ती लगेचच बाजारात विक्रीसाठी न्यावी लागते. आदिवासी बांधवाना पावसाळ्यात हा अल्पकालीन रोजगार उपलब्ध होतो.
WhatsApp Image 2026-05-11 at 11.27.59 AM

लोकसंख्येची माहिती

 
क्रमांकक्षेत्रतपशील
एकूण लोकसंख्या
२९७६ 
पुरुष लोकसंख्या
१५०६ 
महिला लोकसंख्या
१४७० 

उपलब्ध पायाभूत सुविधा

क्रमांकसुविधा प्रकारउपलब्ध (होय/नाही)संख्यारस्त्याने जोडलेले (होय/नाही)
ग्रामपंचायत कार्यालयहोय१ होय
प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)नाही
उपकेंद्र (Sub Center)होय१ होय
अंगणवाडीहोय५ होय
प्राथमिक शाळाहोय४ होय
माध्यमिक शाळानाही
उच्च माध्यमिक शाळानाही
महाविद्यालय / व्यावसायिक केंद्रनाही
समुदाय भवन (Community Hall)नाही
१०स्वस्त दर दुकान (PDS)होय२ होय
११श्मशानभूमी / स्मशानभूमीहोय३ होय
१२इंटरनेट / मोबाईल टॉवरनाही
१३सीएससी केंद्र (CSC Center)नाही

 

प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायत बँक माहिती

खाते नाव: ग्रुप ग्रामपंचायत दहिसर तर्फे तारापुर

बँकेचे नाव : 

शाखेचे नाव: 

अकाउंट नंबर:

आई एफ एस सी कोड :

पत्ता : ग्रुप ग्रामपंचायत दहिसर तर्फे तारापुर, ता. जि. – पालघर (401502)